TRENDING:

Dream11: 'कुणाला कॅप्टन केलं?' महाराष्ट्राच्या पोराने जिंकली रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी कार, खुद्द हिटमॅनने दिली चावी

Last Updated:

Dream11 या अॅपवर एका महाराष्ट्रीयन पोराने ३ कोटी रुपये जिंकले आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी कार सुद्धा जिंकला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्या आयपीएलचा हंगाम हा आपल्या शेवटाकडे रोमहर्षकपणे वळला आहे. पण आयपीएलच्या याच सामन्यावर फॅन्टसी एपमधून रोज कुणी ना कुणी करोडपती होत आहे. तर अनेक करोडपती होण्यासाठी संघर्ष करत आहे. पण अशातच ड्रीम ११ या अॅपवर एका महाराष्ट्रीयन पोराने ३ कोटी रुपये जिंकले आणि टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज बॅटसमन रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी कार सुद्धा जिंकला आहे. खुद्द रोहित शर्माच्या हस्ते कारची चावीही विजेत्या तरुणाला देण्यात आली आहे, त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
News18
News18
advertisement

Dream 11 या फॅन्टसी गेमिंग अॅपने आयपीएलचे सामने सुरू झाले तेव्हाच भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माकडे असलेली लॅम्बोर्गिनी कार जिंकण्याची ऑफर दिली होती. Dream 11 वर पहिल्याच आयपीएलच्या पहिल्याच सामन्यामध्ये एका तरुणाने रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी जिंकली आहे. नुसती त्याची कार जिंकली नाहीतर ३ कोटी जिंकले आहे.

हा तरुण महाराष्ट्रातला आहे, युवराज वाघ असं या तरुणाचं नाव आहे. Dream 11 ने जाहीर केल्याप्रमाणे रोहित शर्माच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट करण्यात आली आहे. रोहित शर्मा सध्या  मुंबई इंडियन्सच्या इतर सहकाऱ्यांसह मुंबईत आहे.  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लवकरच वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार आहे.  याच दरम्यान ही कार रोहित शर्माच्या हस्ते युवराज वाघला देण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dream11: 'कुणाला कॅप्टन केलं?' महाराष्ट्राच्या पोराने जिंकली रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी कार, खुद्द हिटमॅनने दिली चावी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल