आजही त्यांचे घर माझ्या नावावर चालत असेल, तर...
युझवेंद्र पुढे म्हणाला, आमचे लग्न साडेचार वर्षे टिकले होते. जर दोन महिन्यांतच फसवणूक झाली असती, तर कोणी कन्टिन्यू केलं असतं का? मी यापूर्वीही सांगितलं आहे की मी भूतकाळातून बाहेर पडलो आहे. पण काही लोक अजूनही तिथंच अडकले आहेत. आजही अनेक लोक त्याच गोष्टी पकडून आहेत. आजही त्यांचे घर माझ्या नावावर चालत असेल, तर ते तसे करत राहू शकतात, असं म्हणत युझीने धनश्रीला टोमणा देखील मारला आहे.
advertisement
मला फरक पडत नाही
मला कशाचीच काळजी नाही किंवा मला फरक पडत नाही. आणि मला खात्री आहे की माझ्या आयुष्यातील त्या चॅप्टरबद्दल बोलण्याची ही शेवटची वेळ असेल, असं म्हणत युझवेंद्र चहलने मोठं वक्तव्य केलं आहे. तो पुढे म्हणाला, कधी मला थांबल्यासारखं झाल्यासारखे वाटले की मी हनुमान चालीसा ऐकतो. मी दर रात्री ते ऐकतो. खरं तर, कोणत्याही मॅच आधी मी हनुमान चालीसा ऐकतो. यामुळे मला खूप शक्ती आणि फोकस मिळतो, असंही चहल म्हणाला.
मी हनुमान चालीसा ऐकतो
दरम्यान, कोणत्याही मॅच आधी मी हनुमान चालीसा ऐकतो. मी फक्त चांगला खेळ करण्यावर लक्ष देतो. काही ना काही नेहमीच घडत राहील, पण ते सर्व डिस्ट्रॅक्शन आहे. मी माझा वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत आणि माझ्या मित्रांसोबत घालवतो, असं युझी चहल म्हणाला आहे.