मुंबईतील एक महिलेला AIचा वापर करुन गंडा घालणारी दुसरी देखील महिलाच होती. एका 37 वर्षांच्या महिलेनं आपल्याच शेजारी राहणाऱ्या महिलेकडून 7 लाख रुपये वसूल केले आहेत. AIचा वापर करुन तिनं एका माणसाचा आवाज तयार केला आणि 7 लाख रुपयांची फसवणूक केली.
( हेही वाचा - IRCTC वर दुसऱ्याचं तिकीट बूक केलं तर होईल जेल? अखेर आयआरसीटीसीने केला खुलासा )
advertisement
पीडित महिला ही अनेक दिवस नोकरीच्या शोधात होती. या महिलेचं वय 34 वर्ष असून ती विधवा आहे. रश्मी कार असं आरोपी महिलेचं नाव असून आरोपी महिलेनं आपल्या नवऱ्याच्या मदतीनं शेजारी राहणाऱ्या महिलेची फसवणूक केली.
हे प्रकरण जवळपास 7 महिन्यांपासून सुरू झालं होतं. रश्मी कार हिनं अभिमन्यू मेहरा नावानं पीडित महिलेला फोन केला. रश्मी कार हिनं तुमचा नंबर दिला असं पीडित महिलेला सांगितलं. तुम्हाला नोकरीची गरज असल्याचं देखील सांगितलं. या फोननंतर पीडित महिला आणि अभिमन्यू मेहरा यांचं चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर दोघे रिलेशनमध्ये होते. पण दोघांची कधीच भेट झाली नाही. याच काळात पीडित महिलेनं 8 लाख रुपये अभिमन्यू मेहराच्या अकाउंटला ट्रान्सफर केले.
पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिनं अनेकदा अभिमन्यूला भेटण्यासाठी बोलावलं होतं. पण तो नेहमी नकार देत राहिला. त्यानं पीडित महिलेला एक ब्लॅंकेट देखील गिफ्ट केली होती. आपली फसवणूक झाली असं जेव्हा पीडित महिलेच्या लक्षात आलं तेव्हा तिनं पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणानंतर आरोपी महिला आणि तिचा पती दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी रश्मी कार हिनं AI चा वापरु करुन फसवणूक केल्याचं कबूल केलं. Voice changing App वापरुन पीडित महिलेशी पुरुष म्हणून बोलत होती. त्यासाठी तिनं एक खास नंबर घेतला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
