BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन
BSNL आपल्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देते. यासह, यूझर्सना तीन महिन्यांची म्हणजे 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय कंपनी या प्लॅनसह 300 फ्री एसएमएस देखील देते. जे लोक आपला नंबर फक्त कॉलिंगसाठी वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो. तसेच फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. जे ग्राहक त्यांच्या फोनवर डेटा वापरू शकत नाहीत, त्यामुळे आता त्यांना डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
advertisement
आजपासून अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु! OnePlus 13 सह 13R मिळतील स्वस्तात
दीर्घ व्हॅलिडिटी देखील दिलासा
आजकाल महागड्या रिचार्जमुळे लोकांच्या खिशावरचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या ग्राहकाला जास्त पैसे न देता आपला नंबर अॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
Lava ने लॉन्च केली स्वस्त स्मार्टवॉच! AMOLED डिस्प्लेसह मिळतो GPS, पहा किंमत
इतर कंपन्यांनाही आणावे लागतील व्हॉइस ओनली प्लॅन
BSNLप्रमाणेच इतर कंपन्यांनाही लवकरच व्हॉईस प्लॅन लॉन्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी शुल्क आकारले जाईल. गेल्या महिन्यात दूरसंचार नियामक ट्रायने सर्व कंपन्यांना केवळ व्हॉइस प्लॅन लागू करण्याचे आदेश दिले होते. आता कंपन्या त्यांच्या प्लॅनमध्ये मोबाइल डेटा देऊन अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाहीत. याचा परिणाम देशातील सुमारे 15 कोटी 2G यूझर्सवर होईल, जे त्यांच्या प्लॅनमधील डेटासाठी पैसे देऊ इच्छित नाहीत.