TRENDING:

Jio latest Offer : फक्त 9 रुपयांत दररोज 2.5GB डेटा आणि Unlimited Calling, ग्राहकांसाठी खास ऑफर

Last Updated:

सध्या जिओ ही देशातली आघाडीची टेलिकॉम कंपनी असून, जिओचे 47 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. जिओच्या एका प्लॅनबद्दल माहिती घेऊ या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मोबाइल हा आपल्या रोजच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. पूर्वी फक्त कॉलिंग किंवा एसएमएसपुरताच मर्यादित असलेला हा फोन आता इंटरनेटसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो. किंबहुना मोबाइल नसेल, तर सगळीच कामं अडून बसतात. अलीकडेच एअरटेल, व्हीआय, जिओ अशा देशातल्या अनेक महत्त्वाच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सचे दर बरेच वाढवले आहेत. त्यामुळे दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शिवाय, मोबाइलचा खर्च टाळता येण्यासारखा नाही. त्यामुळे तो करण्यावाचून अनेकांकडे पर्यायच नाही. म्हणून खर्च कमी करण्यासाठी अनेकांनी आपले नंबर बीएसएनएलकडे पोर्ट केले आहेत.
jio
jio
advertisement

बीएसएनएल आपली फोरजी सेवा लवकरच देशभर विस्तारित करण्याच्या प्रयत्नात आहे. 2025च्या मध्यापर्यंत देशभरात एक लाख टॉवर्स उभारण्याचं उद्दिष्ट बीएसएनएलने ठेवलं आहे. बीएसएनएलचे प्लॅन्स सर्वांत स्वस्त आहेत; मात्र सध्या जिओ ही देशातली आघाडीची टेलिकॉम कंपनी असून, जिओचे 47 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. जिओच्या एका प्लॅनबद्दल माहिती घेऊ या. त्या प्लॅनमध्ये दररोज नऊ रुपयांमध्ये अडीच जीबी डेटा मिळतो. त्या प्लॅनची माहिती घेऊ या.

advertisement

जिओचा 3599 रुपयांचा वार्षिक प्लॅन चांगला आहे. त्यात 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. तसंच, दररोज अडीच जीबी डेटाही मिळतो.

याशिवाय अन्य काही बेनिफिट्सही या प्लॅनमध्ये आहेत. त्यात जिओ टीव्ही, जिओ क्लाउड या सेवांच्या सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचं सबस्क्रिप्शन मिळत नाही. त्यासाठी वेगळं रिचार्ज करावं लागतं.

advertisement

या प्लॅनच्या मासिक खर्चाचा विचार केल्यास, दरमहा 276 रुपये खर्च येतो. म्हणजेच दररोज जवळपास नऊ रुपये खर्चात अडीच जीबी डेटा मिळतो आणि बेनिफिट्स वेगळेच. त्यामुळे हा जिओचा तुलनेने स्वस्त प्लॅन असून, जास्त डेटा वापर असलेल्यांसाठी तो अधिक उपयुक्त आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio latest Offer : फक्त 9 रुपयांत दररोज 2.5GB डेटा आणि Unlimited Calling, ग्राहकांसाठी खास ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल