TRENDING:

7500 रुपयांनी स्वस्त मिळतोय Motorolaचा भारी फोन! पाहा कुठे आहे ऑफर

Last Updated:

Motorola चा फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. कारण आता अगदी स्वस्तात तुम्हाला फोन खरेदी करता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही Motorola चा फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी खूप फायदेशीर ठरू शकते. Motorola Edge 50 Pro 5G फ्लिपकार्टवर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. ई-कॉमर्स साइट या फोनच्या किमतीत कपात करत आहे. बँक ऑफर देत आहे आणि जुना किंवा सध्याच्या फोन परत करण्यावर अतिरिक्त एक्सचेंज ऑफरद्वारे बचत करण्याची संधी देखील देत आहे. Motorola Edge 50 Pro 5G वर उपलब्ध असलेल्या डील आणि ऑफर्सबद्दल डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
मोटोरोला फोन
मोटोरोला फोन
advertisement

आता YouTube बोलेल तुमची भाषा! Google ने आणलंय जबरदस्त अपडेट

Motorola Edge 50 Pro 5G किंमत आणि ऑफर

Motorola Edge 50 Pro 5G चे 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 31,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. तर हा फोन या वर्षी एप्रिलमध्ये 35,999 रुपयांना (12GB RAM/256GB व्हेरिएंट) लाँच करण्यात आला होता. बँक ऑफरच्या बाबतीत, IDFC बँक क्रेडिट कार्डवरून 3,500 रुपयांची सूट मिळू शकते. त्यानंतर प्रभावी किंमत 28,499 रुपये असेल. हा फोन लॉन्च किमतीपेक्षा 7500 रुपयांनी स्वस्त आहे. एक्सचेंज ऑफरमुळे 20,150 रुपयांची अतिरिक्त बचत होऊ शकते. तसंच, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा एक्सचेंजमध्ये दिलेल्या फोनवर अवलंबून असतो.

advertisement

Tata चा इंटरनेट प्लॅन आहे जबरदस्त! Free मध्ये मिळतोय OTT चा आनंद

Motorola Edge 50 Pro Features & Specifications

Motorola Edge 50 Pro मध्ये 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 2,000 nits पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा 1.5K पोलेड कर्व्ड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज आहे. Motorola चा हा फोन Android 14 वर बेस्ड Hello UI वर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. समोर 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे. जी 125W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्समध्ये डॉल्बी ॲटमॉस, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करणारे IP68 रेटिंग यांचा समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
7500 रुपयांनी स्वस्त मिळतोय Motorolaचा भारी फोन! पाहा कुठे आहे ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल