TRENDING:

Vivo चा 200MP कॅमेरा असणारा फोन लॉन्च! भारी आहेत फीचर्स, किंमत किती?

Last Updated:

Vivo X200 Series Launch: स्मार्टफोन बनाने वाली कंपनी वीवो (Vivo) ने आज अपना बहुप्रतिक्षित स्मार्टफोन एक्स200 सीरीज (Vivo X200 Series) को लॉन्च कर दिया है.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vivo X200 Series Launch: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo ने आज आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन X200 सीरीज लॉन्च केला आहे. या सीरीजमध्ये, कंपनीने दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ज्यात Vivo X200 आणि Vivo X200 Pro यांचा समावेश आहे. या फोनमध्ये यूजर्सना 6000mAh पर्यंतची मोठी आणि पॉवरफुल बॅटरी मिळेल. फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेराही उपलब्ध असेल.
टेक न्यूज
टेक न्यूज
advertisement

Vivo X200 Specifications

Vivo X200 मध्ये 6.67 इंच क्वाड-कर्व्ड OLED LTPS डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय, कंपनीने पॉवरसाठी डिव्हाइसमध्ये 5800mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

7500 रुपयांनी स्वस्त मिळतोय Motorolaचा भारी फोन! पाहा कुठे आहे ऑफर

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX921 सेन्सरसह 50MP मुख्य कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये 50MP IMX882 टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे.

advertisement

Vivo X200 Pro Specifications

फोनच्या प्रो मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, प्रो व्हेरिएंटमध्ये 6.67 इंच क्वाड-कर्व्ड OLED LTPS डिस्प्ले देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 1.63mm च्या अल्ट्रा-स्लिम बेझलला सपोर्ट करतो. या मॉडेलमध्ये 200MP Zeiss APO टेलिफोटो कॅमेरा आहे. जो फोटोग्राफीचा उत्तम अनुभव देतो. हे Vivo V3+ इमेजिंग चिपसह येते आणि 4K HDR सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.

advertisement

पॉवरसाठी, Pro मॉडेलमध्ये मोठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, दोन्ही मॉडेल्स MediaTek Dimensity 9400 चिपसेटवर चालतात, जे 3nm प्रोसेसर टेक्नोलॉजीवर आधारित आहे.

तुमच्या मोबाईल फोनची एक्सपायरी डेट कधी संपणार तुम्हाला माहितीये? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर वाचा...

किंमत किती आहे

किमतींबद्दल बोलायचे झाले तर Vivo X200 च्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 65,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, Vivo X200 Pro च्या 16GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 19 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. तुम्ही ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता. तुम्ही या फोनसाठी HDFC कार्डने पैसे भरल्यास ग्राहकाला 10 टक्के सूट मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Vivo चा 200MP कॅमेरा असणारा फोन लॉन्च! भारी आहेत फीचर्स, किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल