तुमच्या मोबाईल फोनची एक्सपायरी डेट कधी संपणार तुम्हाला माहितीये? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर वाचा...

Last Updated:

Mobile Expiry Date: मोबाइल फोन उत्पादक कंपन्या बॉक्स किंवा वेबसाइटवर एक्स्पायरी डेटची माहिती देत नाहीत.

मोबाईल फोन
मोबाईल फोन
कोणतीही जिन्नस खरेदी केलं, तर त्याला एक्स्पायरी डेट असतं. खासकरून खाद्यपदार्थ आणि औषधांच्या बाबतीत ही एक्स्पायरी डेट पाहूनच खरेदी केली जाते. मोबाइल फोनलाही एक्स्पायरी डेट असते का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे.
मोबाइल फोनलाही एक्स्पायरी डेट असते; मात्र फोन उत्पादक कंपन्या त्याबद्दल जास्त बोलत नाहीत. फोनच्या बॉक्सवर जी माहिती लिहिलेली असते, त्यात फोनच्या उत्पादनाची तारीख लिहिलेली असते. त्याबरोबर एक्स्पायरी डेट लिहिलेली नसते.
फोनवर जी मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते, त्याच दिवसापासून फोनला मिळणारे अपडेट्स सुरू होतात. आयफोन 13 हा फोन 2021मध्ये लाँच झाला आणि 2021मधलीच मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, तर 2024मध्ये तो फोन खरेदी करणाऱ्यांना तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स चुकतील. म्हणजेच कंपनी सात वर्षांपर्यंतचे अपडेट्स देण्याबद्दल सांगत असली, तर त्यातल्या तीन वर्षांचे अपडेट्स मिळणार नाहीत.
advertisement
मोबाइल फोन उत्पादक कंपन्या बॉक्स किंवा वेबसाइटवर एक्स्पायरी डेटची माहिती देत नाहीत. त्यामुळे फोन ज्या वर्षी लाँच झाला, त्याच वर्षी तो खरेदी करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे फोनच्या सगळ्या अपडेट्सचा फायदा युझर्सना मिळू शकतो. फोन जुना होत गेला, की त्याची किंमत आणि वापरायोग्य काळही कमी होत जातो. म्हणून खूप जुना फोन खरेदी करणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
advertisement
कोणतीही कंपनी नवा स्मार्टफोन लाँच करते, तेव्हा फोनची सिक्युरिटी आणि ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटबद्दल माहिती देते. अँड्रॉइड स्मार्टफोन कंपनी साधारणपणे 2-3 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आणि 3-5 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट देते. सॅमसंग आणि वनप्लस यांसारखे काही प्रीमिअम ब्रँड्स सात वर्षं सिक्युरिटी अपडेट्स देतात.
अॅपल कंपनी आयफोन्सना सात वर्षांपर्यंत सिक्युरिटी आणि ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स देते. सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर या बाबी फोन सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. अपडेट्स मिळाले नाहीत, तर फोनमधून डेटा चोरी होऊ शकते. अनेक अॅपचा सपोर्ट फोनवर मिळत नाही. म्हणून फोन ज्या वर्षी लाँच झाला, त्याच वर्षी तो खरेदी करावा.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
तुमच्या मोबाईल फोनची एक्सपायरी डेट कधी संपणार तुम्हाला माहितीये? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर वाचा...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement