एका क्षणात दुकानदाराचा विश्वासघात
1 नोव्हेंबर रोजी दुपारी 40 ते 60 वयोगटातील तीन महिलांचा गट या सराफाच्या दुकानात दाखल झाला. दुकानदार रवींद्र सरफळे (वय 50) यांच्याकडे त्यांनी सोन्याच्या पिना पाहण्याची विनंती केली. महिलांना सांगिल्यानंतर सरफळे यांनी काउंटरवर विविध डिझाईन्स दाखवायला सुरुवात केली. त्याचवेळी महिलांपैकी एकीने दुकानदारात लक्ष विचलित केलं, तर दुसरीने पिशवीतून काही दागिने हळूच गायब केले. काही क्षणांतच त्या तीनही महिला आम्ही खेरदी विचार करून येतोअसं सांगत दुकानाबाहेर गेल्या.
advertisement
थोड्या वेळानंतर दागिन्यांची मोजणी करताना दुकानदाराच्या लक्षात आलं की जवळपास एक लाख दोन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाले आहेत. तत्काळ त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही महिलांनी अत्यंत चालाखिने चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
सध्या पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी पथक तयार केले आहे. फुटेजमधून मिळालेल्या चेहऱ्यांच्या आधारे तपास सुरू असून या महिलांची टोळी इतर ठिकाणीही सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
