TRENDING:

‘तो’ काळ बनून आला, पण चिमुकलीनं डेअरिंग केलं, नराधमाच्या तावडीतून मैत्रिणीला वाचवलं, कसं?

Last Updated:

Thane News: मैत्रीण अडचणीत असल्याचे लक्षात येताच तिने रिक्षाचालकाच्या डोळ्यात माती फेकली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. त्यातच बदलापूर पूर्व परिसरात 10 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane News: ‘तो’ काळ बनून आला, पण चिमुकलीनं डेअरिंग केलं, नराधमाच्या तावडीतून मैत्रिणीला कसं वाचवलं?
Thane News: ‘तो’ काळ बनून आला, पण चिमुकलीनं डेअरिंग केलं, नराधमाच्या तावडीतून मैत्रिणीला कसं वाचवलं?
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी क्लाससाठी जात असताना रस्त्यात एका रिक्षाचालकाने तिला अडवले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. त्या वेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखत तातडीने धाडस दाखवले. मैत्रीण अडचणीत असल्याचे लक्षात येताच तिने रिक्षाचालकाच्या डोळ्यात माती फेकली. त्यामुळे आरोपी काही क्षण गोंधळला आणि त्या संधीचा फायदा घेत दोन्ही मुलींनी तेथून सुरक्षितपणे पळ काढला. तिच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

advertisement

Thane : संशयाचं भूत अंगात संचारलं; शेतात नेले अन्.....; पतीने जे केलं ते वाचून तुमचाही थरकाप उडेल

घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. आरोपी रिक्षाचालक अंबरनाथ परिसरात राहत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक केली.

advertisement

View More

या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेणे सुरुवातीला अवघड जात होते. मात्र तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

गेल्या वर्षी बदलापूरच्या एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर बदलापुरातील प्री-प्रायमरी शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. त्या प्रकरणातही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
‘तो’ काळ बनून आला, पण चिमुकलीनं डेअरिंग केलं, नराधमाच्या तावडीतून मैत्रिणीला वाचवलं, कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल