भिवंडीत पतीच्या आत्महत्येने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार मोहिद्दीन अन्सारी (वय30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आई आणि पत्नी लुबना मोहिद्दीन अन्सारी (वय31) हिच्यासह मुंब्रा येथे राहत होता. पत्नी लुबना हिचा आर्थिक कारणांवरून पतीवर सातत्याने दबाव होता. भिसी भरण्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावत ती मोहिद्दीनला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती, असा गंभीर आरोप मृताच्या आईने केला आहे.
advertisement
4 डिसेंबर रोजी लुबना हिने मोहिद्दीनला फोन करून तब्बल 50 हजार रुपयांची मागणी केली शिवाय पैसे न आणल्यास ''कुठे जाऊन मर'' असे म्हणाली. पत्नीच्या या अशा वागणुकीमुळे मोहिद्दीन पूर्णपणे खचून गेला होता. पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर मोहिद्दीनने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मृताच्या आई जुबेदाखातून मोहम्मद सलीम अन्सारी (वय58) यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चौकशीनंतर पत्नी लुबना हिने पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.
