सोलापूर - सोलापूर शहरातील केगाव येथील सिंहगड कॉलेज इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अनोखी डिव्हाईस बनवलेला आहे. या डिव्हाईसमुळे वखरणी, पेरणी,फवारणी हे तिन्ही काम शेतकरी आता एकाच मशीन वरून करू शकतो. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे ते चारही विद्यार्थी शेतकऱ्यांची मुल आहेत. या मशीन संदर्भात अधिक माहिती विद्यार्थी चेतन म्हेत्रे यांनी Local 18 शी बोलताना दिली.