
बीड : अनेक तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचे विष्णू राठोड हे 26 वर्षीय तरुण शेतकरी आज कांदा लागवडीमुळे चर्चेत आहेत. काही वर्षांपूर्वी ते पुण्यातील कंपनीत 18 हजार रुपयांवर नोकरी करत होते. घरची फक्त दीड एकर शेती असल्याने शेतीत काही मोठं करता येणार नाही, अशीच त्यांची समजूत झाली होती. मात्र कुटुंबाच्या सल्ल्याने आणि शेतीत काहीतरी नव्याने करायला हवं या विचाराने त्यांनी पुन्हा एकदा मातीत परतण्याचा निर्णय घेतला.