
छत्रपती संभाजीनगर : नवनवीन पदार्थ करून खायला आपल्या सर्वांना आवडत असतात. त्यातल्या त्यात जर चटपटीत चाट असेल तर सर्वजण अगदी आवडीने खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडणारा पदार्थ म्हणजे चाट. त्यामुळे शंकरपाळ्यापासून झटपट चाट कसं तयार करायचं? याबद्दलच छत्रपती संभाजीनगर मधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी माहिती सांगितली आहे.
Last Updated: November 20, 2025, 13:13 ISTमुंबई : शेतीत खत देताना पाण्याचे योग्य प्रमाण काय असावे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो बराचसा दुर्लक्षित राहतो. जास्त उत्पादन मिळावे म्हणून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत टाकतात, पण त्यासोबत पाण्याचे योग्य प्रमाण राखले नाही तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होते. रासायनिक, सेंद्रिय, द्रवरूप किंवा पाण्यात विरघळणारे खत असो, खत किती टाकायचे हे महत्त्वाचे नसून ते किती पाण्यात द्यायचे हे सर्वात निर्णायक ठरते. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तसेच मायक्रोन्यूट्रिएंट्स यांची कार्यक्षमता तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे
Last Updated: November 20, 2025, 14:31 ISTज्वेलरी, मेहंदी, स्टोरी टेलिंग असे नाविन्यपूर्ण प्रकार प्रसिद्ध पावत असल्याने मेहंदी व्यवसायाची रंगत आणि उलाढाल वाढली आहे. भारतीय, फ्लोरल, दुबई, अरेबिक, गल्फ या मेहंदीच्या प्रचलित स्टाईल बरोबरच नवे ट्रेंड येत आहेत. मेहंदी आता पूर्वेकडीलच नाही तर पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यामुळेच मेहंदी ही कला आता करियर म्हणून मान्यता पावताना दिसत आहे.
Last Updated: November 20, 2025, 14:00 ISTपुणे : पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशीच एक घटना शिक्रापूरमध्ये घडली आहे. सिकंदर शेख यांच्या चिकन दुकानात विक्रीसाठी दररोजप्रमाणे आलेल्या बॉयलर जातीच्या पक्ष्यांमध्ये चक्क चार पायांची कोंबडी दिसली. विशेष म्हणजे दुकानदार, स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनाही ही गोष्ट पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने कुतूहलाचं वातावरण आहे. ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी होतेय.
Last Updated: November 20, 2025, 13:42 ISTअमरावती : हिवाळा सुरू होताच चटपटीत काहीतरी खायची इच्छा वाढते. त्यात हिरव्या मिरचीचे लोणचे हे जेवणाची चव दुप्पट करणारी खास डिश आहे. अगदी घरगुती साहित्य वापरून हे लोणचे तयार होते. दररोजच्या जेवणाची चव वाढवणारे लोणचे कमीत कमी वेळात तुम्ही तयार करू शकता. जाणून घेऊ रेसिपी
Last Updated: November 19, 2025, 20:00 IST