TRENDING:

शेतात खत टाकताना पाण्याचे सांभाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान! पाहा योग्य प्रमाण..

मुंबई : शेतीत खत देताना पाण्याचे योग्य प्रमाण काय असावे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो बराचसा दुर्लक्षित राहतो. जास्त उत्पादन मिळावे म्हणून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत टाकतात, पण त्यासोबत पाण्याचे योग्य प्रमाण राखले नाही तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होते. रासायनिक, सेंद्रिय, द्रवरूप किंवा पाण्यात विरघळणारे खत असो, खत किती टाकायचे हे महत्त्वाचे नसून ते किती पाण्यात द्यायचे हे सर्वात निर्णायक ठरते. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तसेच मायक्रोन्यूट्रिएंट्स यांची कार्यक्षमता तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे

Last Updated: November 20, 2025, 14:31 IST
Advertisement

Winter Clothes : मुंबईकरांनो, स्वेटर, जाॅकेट घेऊन टाका, थंडी वाढणार, किंमत फक्त 50 रुपयांपासून!

मुंबई : मुंबईत हिवाळ्याची चाहूल लागल्याने शहरातील नागरिकांनी थंडीच्या कपड्यांची खरेदी मोठ्या उत्साहात सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर परेलमधील प्रसिद्ध स्वेटर मार्केटमध्ये सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरवर्षी हिवाळा सुरू होताच येथे विविध प्रकारचे कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजचे स्टॉल्स उभे राहतात. परळ स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आणि प्रभादेवी परिसरालाही जवळ असल्याने या मार्केटला मोठी मागणी असते.

Last Updated: November 20, 2025, 15:54 IST

तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर आताच थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम

अमरावती : सध्या फॅशनच्या ओघात अगदी लहान मुलींमध्येही मेकअपचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. शाळेत जाणाऱ्या, फक्त 10-12 वर्षांच्या मुली देखील आय लाइनर, आय शॅडो, लिपस्टिक आणि इतर मेकअप प्रॉडक्टचा वापर करू लागल्या आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओज, स्टाईल आणि पटकन सुंदर दिसण्याची इच्छा यामुळे या वयातच मुली मेकअपकडे आकर्षित होत आहेत. परंतु, तज्ज्ञांच्या मते या गोष्टीकडे फक्त सौंदर्याचा भाग म्हणून न पाहता आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करणं आवश्यक आहे. कारण केमिकल असलेल्या मेकअप प्रॉडक्टमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Last Updated: November 20, 2025, 15:05 IST
Advertisement

मेहंदीतून नशिब उजळलं! 23 व्या वर्षी मानसी करते लाखोंची कमाई

ज्वेलरी, मेहंदी, स्टोरी टेलिंग असे नाविन्यपूर्ण प्रकार प्रसिद्ध पावत असल्याने मेहंदी व्यवसायाची रंगत आणि उलाढाल वाढली आहे. भारतीय, फ्लोरल, दुबई, अरेबिक, गल्फ या मेहंदीच्या प्रचलित स्टाईल बरोबरच नवे ट्रेंड येत आहेत. मेहंदी आता पूर्वेकडीलच नाही तर पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यामुळेच मेहंदी ही कला आता करियर म्हणून मान्यता पावताना दिसत आहे.

Last Updated: November 20, 2025, 14:00 IST

अहो खरंच! पुण्यात दिसली चार पायाची कोंबडी, पाहण्यासाठी लागल्या रांगा, Video

पुणे

पुणे : पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशीच एक घटना शिक्रापूरमध्ये घडली आहे. सिकंदर शेख यांच्या चिकन दुकानात विक्रीसाठी दररोजप्रमाणे आलेल्या बॉयलर जातीच्या पक्ष्यांमध्ये चक्क चार पायांची कोंबडी दिसली. विशेष म्हणजे दुकानदार, स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनाही ही गोष्ट पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने कुतूहलाचं वातावरण आहे. ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी होतेय.

Last Updated: November 20, 2025, 13:42 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
शेतात खत टाकताना पाण्याचे सांभाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान! पाहा योग्य प्रमाण..
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल