उद्धव ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मॉरिसभाई नरोना नावाच्या या इसमाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये त्यांना 5 गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. तसंच गोळीबारानंतर मॉरिसने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा चिरंजीव अभिषेक घोसाळकर होते. या घटनेमुळे दहिसरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला आहे, ते मॉरिस भाईचं ऑफिस होतं.