देशमुख हत्या प्रकरणात 3 जण वॉन्टेड. संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी फरार झाल्याचे सीआयडीकडून घोषित करण्यात आले असून पकडून देणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धी पत्र जारी करण्यात आले आहे. या आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिले जाईल व नाव गोपनी ठेवले जाईल अशी हमी देण्यात आली आहे.