वाल्मिक कराड यांचा नवा व्हिडिओ समोर येत असून त्यांनी शरण येत असल्याचं सांगितलं आहे. ते पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडीच्या मुख्यालयात शरण येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या व्हिडिओमध्ये त्यांनी जर मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी आढळले तर मला शिक्षा मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या व्हिडिओ नंतर मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली असून, तपासावर त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संतोष देशमुख यांच्या भगिनी यांनी प्रतिक्रिया देत न्यायाची मागणी केली आहे.