सीआयडी पाठोपाठा आता एसआयटीच्या पथकानंही संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणी चौकशीचे सूत्र हाती घेतले आहे. या प्रकरणात फरार आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यामुळे बीड प्रकरणी तपासाला वेग येणार आहे. मस्साजोग प्रकरणी एकाचवेळी दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे. एकीकडं सीआयडीनं तपास सुरु केला आहे तर दुसरीकडं एसआयटी मार्फतही चौकशी केली जात आहे. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. तर आता एसआयटीनंही तपास चक्र हलवली आहेत. त्यामुळे आगामी काळात तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.