बीड हत्या प्रकरणात आजचा दिवस महत्वाचा ठरू शकतो..वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करू शकतात..रात्री त्यांना पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहीती आली मात्र ती खोटी ठरली..आज सीआयडीकडून कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. फरार आरोपींची संपत्ती सील करण्याची कोर्ट परवानगी देण्याची शक्यता असून काल सापडलेल्या मोबाईल मधील काही महत्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.