
Marathi Song : 2016 मध्ये 'जाऊ द्या ना बाळासाहेब' हा कॉमेडी चित्रपट आला होता. या चित्रपटात एक गाणं होते जे खूपच लोकप्रिय झाले होते. ते गाणं होते 'डॉल्बी वाल्या'. हे गाणं नागेश मोर्वेकर यांनी गायले होते.तर संगीत अजय-अतुलने दिले होते. तर या गाण्याचे बोलही अजय-अतुल यांनीच लिहिले होते. हा एक कॉमेडी चित्रपट होता. या गाण्यामुळे तरुणांमध्ये खूपच उत्साह निर्माण झाला होता. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हाणकर यांनी मुख्य भूमिका केली होती.
Last Updated: December 05, 2025, 22:51 ISTमुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र श्रीनिवार पवार यांचा विवाह नुकताच थाटामाटात पार पडला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन येथे पार पडत असून या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खासदास सुप्रिया सुळे यांनी हे व्हिडीओ शेअर केले आहे.
Last Updated: December 05, 2025, 20:22 ISTपुणे : पिंपरी-चिंचवड येथील निगडी परिसरात राहणाऱ्या नीलम दिघे यांनी स्वतःच्या मेहनतीवर मोमोजचा व्यवसाय सुरू केला आहे. M.A.B.Ed पर्यंत शिक्षण झालं असतानाही नीलम यांनी नोकरीचा विचार न करता काहीतरी स्वतः करायचं ठरवलं. त्यातूनच त्यांनी छोटासा मोमोजचा स्टॉल सुरू केला. स्टॉल चालू केल्या तेव्हा सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हार न मानता नीलम यांनी आपलं काम चालू ठेवलं. आज त्या मोमोजच्या स्टॉलमधून महिन्याला जवळपास लाखभर रुपयांची कमाई करतात. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
Last Updated: December 05, 2025, 19:23 ISTChhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात फक्त 75 घरं आहेत, त्यापैकी 50 पेक्षा जास्त घरातील मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकरीत काम करतात.
Last Updated: December 05, 2025, 18:20 ISTबटाटा वडा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. वर्ध्यातया बटाटा वड्याला 'आलू बोंडा' असं देखील म्हणतात. त्यात वर्ध्यातील भोगेच्या आलुबोंड्याची चवच न्यारी असून हा बटाटा वडा खवय्यांना भुरळ घालतोय. तब्बल 50 ते 60 वर्षांपूर्वी केशवराव सिताराम भोगे यांनी संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात केली होती. आता भोगेचा आलू बोंडा आणि मूंग वडा या नावाने पदार्थ प्रसिद्ध आहेत.
Last Updated: December 05, 2025, 17:42 ISTकाही वेळा घरातील मुलांचं लग्न जमवण्यासाठी काही अडचणी येतात. त्यावेळी मुलांची बेडरुम कोणत्या दिशेला हवी याबाबत पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी माहिती दिलीय.
Last Updated: December 05, 2025, 16:39 IST