TRENDING:

केतकी- प्रथमेशच्या गाण्यापुढे हिंदी गाणीही फेल, शाळेच्या गॅदरिंगमध्येही वाजतं

Marathi Love Song : 'टाइम पास' चित्रपट 3 जानेवीरी 2014 मध्ये आला होता. या चित्रपटातील एक गाणं आहे 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यात ते दोघं प्रेमी युगुल आपल्या प्रेमात धुंद असलेले दाखवले आहेत. प्रथमेश परब हा दगडू नावाच्या भूमिकेत आहे. जो खूप गरीब कुटूंबातून असतो. तर केतकी प्राजूच्या भूमिकेत आहे. जी अभ्यासात खूप हूशार असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रवी जाधव यांनी केले आहे. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत होते. हे गाणं स्वप्निल बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायले आहे.

Last Updated: December 05, 2025, 10:31 IST
Advertisement

Success Story : शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, सव्वा एकरमध्ये केली घेवडा लागवड, वार्षिक साडेतीन लाख कमाई

Success Story

बीड : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. सात एकर शेती असूनही केवळ सव्वा एकर जागेत घेवड्याची (राजमा) लागवड करून एका शेतकऱ्याने लाखोंची कमाई साध्य केली आहे. नित्रुड येथील महादू घोटकर यांनी कमी क्षेत्रात प्रयोगशील शेती करत परंपरागत विचारांना छेद दिला असून, त्यांच्या या मॉडेलमुळे स्थानिक शेतकरी समुदायामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील वर्षापासून सुरू केलेला हा प्रयोग यंदाही यशस्वी ठरला असून, कमी खर्चात मोठा नफा हेच घोटकर यांच्या शेतीचे वैशिष्ट्य ठरले आहे.

Last Updated: December 05, 2025, 13:34 IST

Good Cholesterol vs. Bad Cholesterol: नक्की काय आहे फरक हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली माहिती पाहा!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तुमच्या बहुतांश हृदयविकारांचे प्रमुख कारण उच्च कोलेस्ट्रॉल आहे. चला जाणून घेऊया उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? उच्च किंवा कमी कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत? कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? याबाबत पुणेयेथील डॉ. अविनाश भोंडवे यांनी आपल्याला अधिक माहिती दिली आहे.

Last Updated: December 05, 2025, 13:10 IST
Advertisement

Dogs Care: घरी श्वान पाळणे हे सोपं नाही! थांबा; आधी 'या' ५ जबाबदाऱ्या जाणून घ्या; अन्यथा होईल पश्चात्ताप!

आपण देखील घरी श्वान घेण्याच्या विचारात आहात तर त्यापूर्वी काही बाबी लक्षात घेऊन श्वान निवडणे गरजेचे आहे. श्वान आणि आपले दैनंदिन जीवन यातील तारतम्य बाळगून जर योग्य श्वान निवडल्यास श्वान आणि श्वान पालक यांच्यात उत्तम समन्वय राहण्यास मोठी मदत होऊ शकते. नागपूरमधील श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी या विषयी अधिक माहिती दिली आहे.

Last Updated: December 04, 2025, 20:34 IST

घशात सारखा कफ येतोय? हे आहे गंभीर कॅन्सरचं पहिलं लक्षण; दुर्लक्ष करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या!

कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणे अगोदरच आढळून आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. घशाचा कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची लक्षणे खूप पूर्वीपासून दिसू लागतात. घशाच्या कॅन्सरसाठी सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा आदी पदार्थ प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे घशाच्या कॅन्सरकडे लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा जीवघेणा आजार टाळता येऊ शकतो, याबाबत पुण्यातील डॉक्टर कल्पना गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

Last Updated: December 04, 2025, 19:51 IST
Advertisement

'गेला बाराच्या भावात' म्हणीचा आणि पानिपतच्या युद्धाचा काय संबंध? या वाक्प्रचारामागचा मोठा इतिहास पाहा!

काही मैल अंतर पार केलं की संस्कृती आणि बोली भाषा बदलते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील मराठी भाषेत अनेक बोली भाषांचा समावेश आहे. त्यामुळे भाषेच्या समृध्दीत मोठी भर पडली आहे. याच मराठी भाषेत फार मोठ्या गोष्टींचा अर्थ एक वाक्य, म्हणी किंवा वाक्प्रचारतून व्यक्त होतो. अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आजही बोलताना वापरले जातात. मात्र त्या मागे नेमका इतिहास आणि त्याची उत्पत्ती कशावरून झाली हे जाणणे अधिक उत्सुकतेचे असते. अशीच एक म्हण म्हणजे 'गेला बाराच्या भावात' ही होय.

Last Updated: December 04, 2025, 19:09 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
केतकी अन् प्रथमेशच्या गाण्यापुढे हिंदी गाणीही फेल, शाळेच्या गॅदरिंगमध्येही वाजतं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल