2024 हे निवडणुकांचं वर्ष असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही लोकप्रिय घोषणा जाहीर केल्या जाणार आहेत असा जाणकारांचा अंदाज आहे. यामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या योजनांचाही समावेश असेल. या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे.