लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तिथे सध्या अत्यंत संवेदनशील वातावरण आहे. मंगळवारी छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात 29 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर गडचिरोली आणि छत्तीसगड भागात टेन्शन आहे. गडचिरोली मध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी नृत्यात भाग घेतला. बडा माडिया युवक युवतींच्या आदिवासी नृत्यासोबत त्यांनाही ठेका धरला. त्यांनी मांदरी वाद्य वाजवून प्रचार केला आहे.