विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग : एकीकडे पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. खराब हवामान आणि चक्रीवादळाची स्थिती असल्याने मच्छीमारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गोव्यातील हरमल समुद्र किनाऱ्यावर पॉपलेट, सुरमई माशंचा बम्पर कॅच (माशंचा खच) सापडल्याने खवय्यांची चांगली सोय झाली आहे.