कोल्हापूर : चातुर्मासातील शेवटचा मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सण आणि उत्सव अशा दोन्ही स्वरुपात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी वसुबारस ते कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, गोवत्स द्वादशीनंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी महत्त्वही अनन्य साधारण आहे. यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत तसेच मुहूर्ताबाबत संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्मीपूजन नेमके कधी करावे? लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी कोल्हापुरातील मंदिर आणि शास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिलीये