
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाली अशी वरिष्ठ सुत्रांकडून माहिती मिळाली.भाजप सत्ता स्थापन करत असेल तर ठाकरे गट भाजपच्या सोबत आहे असे सुत्र म्हणत आहेत. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले,' या सुत्रांवर वेगरै आम्ही विश्वास ठेवत नाही. आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी ते अशा बातम्या पेरल्या जातात.तुमचा सहकारी पक्षाने पाण्यात देव ठेवलेत. आम्ही आमचा देव नंतर बाहेर काढू."