मुंबईत गणेशोत्सवाच्या धामधूमीला मोठ्या जल्लोषात सुरूवात झालीय येत्या ७ तारखेपासून होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आता मुंबईतील मोठी सार्वजनिक मंडळ आपल्या बप्पाला घेऊन जाण्यासाठी लालबाग - परळ - या भागात मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. बप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या मुंबईकर गणेशभक्तांनी मराठमोळ्या गाण्यांवर ठेका धरल्याचं ठिकठिकाणी पहायला मिळतंय. चिंतामणी गणपतीचं देखील शनिवारी जोरदार आग्मन झालं. त्यावेळी भाविक लोखांच्या गर्दीनं जमा झाले.