पाहता पाहता नवरात्राचे आठ दिवस संपले आणि आता 30 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रातील नववा दिवस साजरा होणार आहे. या दिवशी नवदुर्गांमधील अखेरचे रूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या स्वरुपाची आराधना केल्याने भक्तांना सर्व सिद्धी, कीर्ती, संपत्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. दसर्याच्या दिवशी नवरात्राची सांगता होते, मात्र सिद्धिदात्री देवीची उपासना ही नवरात्रीचा समारोप मानला जातो. देवी सिद्धिदात्रीची पूजाविधी आणि या दिवशी देवीला कोणता नैवेद्य आणि कोणती माळ अर्पण करावी याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.