मुंबईच्या परळमधील महाराजाची यंदाची मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे. एकाच पायावर उभी असलेली ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. कलाकारांच्या कौशल्याचा आणि श्रद्धेचा संगम या मूर्तीत दिसून येतो.