
पुणे : भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा वीट उत्पादक देश आहे. प्राचीन वास्तूंपासून अगदी आजपर्यंत, सर्वात जास्त काळ बांधकामासाठी विटा वापरल्या जात आहेत. वीट उत्पादन काही वर्षांमध्ये अधिक प्रगत झाले आहे. अनेक वर्षे भक्कमपणे उभ्या असलेल्या अनेक जुन्या वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या विटांचा वापर करून बांधल्या गेल्या आहेत. विटभट्टीत वीट कशी बनते आणि या ठिकाणच्या कारागीर यांची दैनंदिनी कशी जाते? या विषयी आपण माहिती जाणून घेणारं आहोत.
Last Updated: November 06, 2025, 18:29 ISTपुणे : आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं की सर्वात पहिल्यांचा शुभ मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त याचा अर्थ शुभवेळ किंवा चांगली वेळ असा असतो. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ चांगल्या मुहूर्तावर केला तर त्याची फळे भविष्यात चांगली मिळतात, असा लोकमानस असतो. त्यामुळेच मुहूर्त शास्त्राला महत्त्व आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा मुहूर्त शास्त्राशी कधी ना कधी संबंध येतोच. लग्न, मुंज, नामकरण, गृहप्रवेश आदी सोहळ्यांसाठी मुहूर्त पाहूनच वेळ ठरवली जाते. हा शुभ मुहूर्त कसा काढला जातो? आणि त्याचे महत्त्व काय आहे? हे पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 06, 2025, 18:57 ISTबीड : आजच्या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. जीवनातील स्पर्धा, अपयश, आर्थिक अडचणी आणि सामाजिक दडपण यामुळे अनेकजण तणाव आणि डिप्रेशनच्या विळख्यात सापडत आहेत. डिप्रेशन म्हणजे केवळ दुःख किंवा नैराश्य नव्हे, तर ते मन, विचार आणि शरीर यांच्यावर परिणाम करणारा मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला जीवनात आनंद वाटत नाही, झोप कमी होते, भूक मंदावते आणि आत्मविश्वास कमी होतो, अशी माहिती डॉक्टर नागेश पाठक यांच्याकडून मिळाली.
Last Updated: November 06, 2025, 18:00 ISTवर्धा : रव्याचे लाडू अनेकांना खायला आवडतात. आता पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रव्याचे लाडू खाल्ले असतील. मात्र, कधी रवा न भाजता, तुपाशिवाय आणि पाका शिवाय लाडू खाल्ले आहेत का? हे लाडू इतर लाडू पेक्षा झटपट तयार होतात आणि कोणीही सहज बनवू शकतं. रव्याचे नव्या पद्धतीचे लाडू कसे बनवायचे? याचीच माहिती वर्धा येथील गृहिणी समीक्षा चव्हाण यांनी दिली आहे.
Last Updated: November 06, 2025, 17:30 ISTपुणे - आपल्या शरीरात प्रत्येक अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यापैकीच कान हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अनेकांना कानासंदर्भात वेगवेगळे त्रास जाणवत असतात. त्याचप्रमाणे जाणवणारा कर्णनाद म्हणजे कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणं. हा आवाज कमीजास्त होत असतो. सर्वसाधारणपणे शांतता असताना त्याची तीव्रता जास्त जाणवते. ज्यांना कर्णनादाचा त्रास असतो त्यांची ऐकू कमी येण्याचीही तक्रार असते. परंतु याची प्रमुख लक्षणे काय आहेत आणि कशामुळे हा त्रास होतो? याबद्दलचं आपल्या पुण्यातील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार व्होरा यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 06, 2025, 17:12 IST