
सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिल्ली येथे अचानक झालेल्या कार ब्लास्टने राजधानी शहर हादरले. हा अपघात इतका गंभीर होता की यात अनेक लोक जखमी झाले, तर काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेतील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात धाव घेतली.आणि जखमींची विचारपूस केली.