मुंबई: तब्बल 14 दिवसांनी भारतीच्या तिन्ही दलांनी संयुक्त कारवाई करुन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. पाकिस्तानात 6 ठिकाणी एअर स्ट्राइक करुन 24 पेक्षा जास्त स्थळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करण्यात आले होते. या एअर स्ट्राइकनंतर आसावरी जगदाळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आसावरीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.