
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. आज 28 जानेवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. तर नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या त्यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी स्मशान शांतता आहे.