28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार! 6 महिन्यांपूर्वीच केली होती भविष्यवाणी, अजूनही धोका टळलेला नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Astrologer Plane Crash Prediction : विमान अपघात झाल्यानंतर एका ज्योतिषाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने प्लेन क्रॅशची भविष्यवाणी केली होती.
advertisement
1/5

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाल्याने पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. पण 28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार, असा इशारा एका ज्योतिषाने आधीच दिला आहे.
advertisement
2/5
जवळपास एक वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या ज्योतिषाने 28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तसंच अनेक पॉडकास्टवरही आपल्या या भविष्यवाणीवर ते ठाम राहिले. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/5
आता अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्या ज्योतिषाने पुन्हा आपला व्हिडीओ पोस्ट करत आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं. त्याने याआधी केलेल्या भविष्यवाणीचे पुरावेही दिले आहेत. तसंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधीचे व्हिडीओही आहेत. (अजित पवारांच्या विमान अपघाताचा फोटो)
advertisement
4/5
सुमिताचार्य महाराज असं या ज्योतिषाचं नाव आहे. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील माहितीनुसार त्यांना पद्मश्रीही मिळालेला आहे. सुमिताचार्य महाराज म्हणाले होते की, 28 जानेवारी ते 27 फेब्रुवारी विमान प्रवास करू नका. 28 जानेवारी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. 27 फेब्रुवारी हा धोका असल्याचं सांगत त्यांनी या तारखेपर्यंतच्या फ्लाइट्स तिकीट्स कॅन्सल करा, असा सल्ला दिला आहे. (अजित पवार यांच्या विमान अपघाताचा फोटो)
advertisement
5/5
दरम्यान सुमिताचार्य यांच्या भविष्यवाणीत उत्तर-पूर्व दिशेचा उल्लेख आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी बारामतीतील घटनेला लागू होत नाही, असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. दरम्यान ज्योतिषाने केलेली ही भविष्यवाणी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
28 जानेवारीला प्लेन क्रॅश होणार! 6 महिन्यांपूर्वीच केली होती भविष्यवाणी, अजूनही धोका टळलेला नाही