TRENDING:

February Horoscope 2026: फेब्रुवारीत लागोपाठ गुडन्यूज; या 5 राशींची अचानक धनकमाई, लव्हमॅरेजचे योग

Last Updated:
February 2026 Lucky Zodiac Signs: बघता-बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला असून फेब्रुवारी महिना सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. इंग्रजी कॅलेंडरमधील हा दुसरा महिना 5 राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मेष, वृषभ, मिथुन, कन्या आणि धनु राशीच्या व्यक्तींच्या करिअरसाठी फेब्रुवारी महिना आनंदाची बातमी घेऊन येईल. या काळात नवीन नोकरीच्या संधी, पदोन्नती आणि उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी देखील हा काळ सुखद असेल. अचानक धनलाभ, मालमत्ता आणि नवीन वाहन खरेदीचे योगही जुळून येत आहेत.
advertisement
1/5
फेब्रुवारीत लागोपाठ गुडन्यूज; या 5 राशींची अचानक धनकमाई, लव्हमॅरेजचे योग
मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आनंदाचा असेल. या महिन्यात तुम्हाला एखादी मोठी शुभवार्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही चांगली बचत करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील.
advertisement
2/5
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हा महिना उत्तम राहील. व्यावसायिक आपल्या कामाचा विस्तार करू शकतात किंवा नवीन भागीदारी करू शकतात, ज्यातून मोठा नफा होईल. नवीन घर, दुकान, जमीन किंवा कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधातील जुने वाद मिटून नाते पुन्हा रुळावर येईल. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या.
advertisement
3/5
फेब्रुवारी महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. परदेशातून धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक जीवन सुखी आणि समाधानी राहील. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे, फक्त मेहनत सुरू ठेवा.
advertisement
4/5
कन्या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये या महिन्यात वाढ होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अपार धनलाभ होऊ शकतो, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जे लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरी करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा महिना सकारात्मक राहील. कुटुंबासोबत पर्यटनाचे योग आहेत. वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
5/5
धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना शुभ फलदायी ठरेल. परदेशातील व्यवसाय किंवा करिअरच्या दृष्टीने तुम्हाला चांगली बातमी मिळेल. मालमत्ता किंवा जमिनीत केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा मिळवून देईल. तुमच्या साहसात आणि पराक्रमात वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही शत्रूंवर मात कराल. जुन्या वादांतून तुमची सुटका होईल. जे लोक अविवाहित आहेत, त्यांचे विवाह जमण्याचे योग आहेत. धार्मिक कार्यांमध्ये तुमचे मन रमेल आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
February Horoscope 2026: फेब्रुवारीत लागोपाठ गुडन्यूज; या 5 राशींची अचानक धनकमाई, लव्हमॅरेजचे योग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल