स्वप्नात दिसत असेल मांजर, तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो मोठ्या संकटाचा इशारा!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
झोपेत पडणारी स्वप्ने केवळ मनाचा खेळ नसून ती भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सूचक असतात, असे 'स्वप्न शास्त्र' सांगते. अनेकदा आपल्याला स्वप्नात प्राणी दिसतात, त्यापैकी मांजर दिसणे हे अत्यंत रहस्यमय मानले जाते.
advertisement
1/7

झोपेत पडणारी स्वप्ने केवळ मनाचा खेळ नसून ती भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सूचक असतात, असे 'स्वप्न शास्त्र' सांगते. अनेकदा आपल्याला स्वप्नात प्राणी दिसतात, त्यापैकी मांजर दिसणे हे अत्यंत रहस्यमय मानले जाते. भारतीय संस्कृतीत मांजरीला अलक्ष्मीचे रूप मानले जात असले तरी, स्वप्न शास्त्रानुसार याचे अर्थ परिस्थितीनुसार बदलतात. जर तुम्हालाही स्वप्नात वारंवार मांजर दिसत असेल, तर ते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाचे किंवा अनपेक्षित सुखाचे संकेत असू शकतात.
advertisement
2/7
स्वप्नात काळी मांजर दिसणे : काळ्या मांजरीला आपण वास्तवात अशुभ मानतो, मात्र स्वप्न शास्त्रात याचे दोन अर्थ आहेत. जर काळी मांजर केवळ दिसली, तर तो धनलाभाचा संकेत असू शकतो. परंतु, जर काळी मांजर तुमच्यावर हल्ला करताना दिसली, तर तो तुमच्या प्रतिष्ठेला तडा जाण्याचा किंवा मोठ्या अपयशाचा इशारा आहे.
advertisement
3/7
मांजरींचे भांडण पाहणे: जर तुम्ही दोन मांजरींना आपापसात लढताना पाहिले असेल, तर सावध व्हा. हे स्वप्न दर्शवते की आगामी काळात तुमचे कोणाशी तरी मोठे वादविवाद किंवा भांडण होऊ शकते. यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
4/7
पांढरी मांजर दिसणे: पांढरी मांजर शांतीचे प्रतीक वाटत असली तरी, स्वप्नात तिचे दिसणे संमिश्र फळ देते. काही शास्त्रानुसार हे धनप्राप्तीचे लक्षण आहे, तर काहींच्या मते हे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या फसवणुकीचा इशारा आहे.
advertisement
5/7
मांजरीचे पिल्लू दिसणे: स्वप्नात लहान आणि गोंडस मांजरीचे पिल्लू दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या अडकलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.
advertisement
6/7
मांजर तुमच्यावर हल्ला करत असेल तर: जर स्वप्नात मांजर तुम्हाला ओरबाडत असेल किंवा तुमच्यावर झेप घेत असेल, तर ही तुमच्या शत्रूंपासून सावध राहण्याची वेळ आहे. तुमचे गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचत असून ते तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक इजा पोहोचवू शकतात.
advertisement
7/7
मेलेली मांजर पाहणे: स्वप्नात मृत मांजर पाहणे हे सकारात्मक चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता किंवा भीतीचा काळ संपणार आहे. तुमच्या शत्रूंचा पराभव होणार असून तुम्ही संकटातून सुखरूप बाहेर पडणार आहात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
स्वप्नात दिसत असेल मांजर, तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो मोठ्या संकटाचा इशारा!