Ajit Pawar Death : अबाल वृद्धांपासून सगळेच भावूक, दादांच्या निधनाने मंत्र्यांची नातंही रडली; लाडक्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मधील लाडक्या बहिणींना अश्रू अनावर झाले होते. आमचे दादा आमचे सर्वस्व होते.गरिबांचे नेते होते. दादा गेल्यामुळे आज आमची बारामती उघडी पडली.
advertisement
1/8

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये येत असताना अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.अजित पवार यांच्या या निधनानंतर पवार कुटुंब,बारामतीकर आणि राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
advertisement
2/8
अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच खुप दु:ख झाले आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. दरम्यान अजित पवार याच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या.या जाणून घेऊयात.
advertisement
3/8
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मधील लाडक्या बहिणींना अश्रू अनावर झाले होते. आमचे दादा आमचे सर्वस्व होते.गरिबांचे नेते होते. दादा गेल्यामुळे आज आमची बारामती उघडी पडली. आता दादाच राहिले नाही त्यामुळे काही बोलू शकत नाही.लाडक्या बहिणींना त्यांनी खूप सपोर्ट केला, गरिबांचे ते दादा होते,अशा शब्दात एका लाडक्या बहिणीनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
4/8
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामती रुग्णालयातुन विद्या प्रतिष्ठान मध्ये हलवण्यात आले आहे. यावेळी रुग्णवाहिकेमध्ये पार्थ पवार पुढे बसले असून कुटुंबातील सदस्य सोबत आहे. अजित पवारांचे पार्थिव घेऊन जाताना कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश.'अजित दादा अमर रहे', 'दादांचे दादा अजित दादा' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
advertisement
5/8
अजित पवार यांच्या निधनानंतर शिरूर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तर सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचाही सर्वच राजकीय पक्षांनी आज प्रचार बंद ठेवला आहे.रायगडच्या इंदापूर शहरात बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.
advertisement
6/8
अजित पवार यांच्या निधनानंतर नगर जिल्हाध्यक्षालाही अश्रू अनावर झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा, गोरगरिबांचा कैवारी गेला. माझे वडील गेले असले तरी चालले असते.असा माणूस होणे नाही हो, काही प्रतिक्रिया नाही. कालच मला मुंबईला बोलावलं होत,आम्ही अर्धा तास चर्चा केली, नगर जिल्ह्याची,तालुक्याची रचना आणि विकासावर आमची चर्चा झाली,असे नगर नगर जिल्हाध्यक्षांनी यावेळी सांगितलं.
advertisement
7/8
शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या सभा पार पाडायच्या. या प्रांगणा बाहेरील एका वृद्ध कार्यकर्त्याने अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. दादा जाणं म्हणजे बारामतीवर शोककळा आहे.जसे महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि हिंदू धर्म वाढवला तसेच दादा गेले म्हणजे बारामतीचा शो गेला.बारामतीला वाईट दिवस आले. दादा जाणे हे अत्यंत दु:खद आहे.दादा जायला नको होते, पण ते गेले अशा शब्दात एका वृद्ध कार्यकर्त्यांने दु:ख व्यक्त केले.
advertisement
8/8
अजित पवार यांच्या निधनाची माहिती कळताच मंत्री हसन मुश्रीफ यांची नात ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हसन मुश्रीफ यांची लहानगी नात आयेझा मुश्रीफ हिला या निधनाची माहिती मिळताच तीही भावूक झाली होती.अनेकदा सभेच्या वेळी तिची अजित पवार यांच्यासोबत भेट झाली होती.पण आज अचानक मृत्यूची बातमी कळताच तिला देखील अश्रू अनावर झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ajit Pawar Death : अबाल वृद्धांपासून सगळेच भावूक, दादांच्या निधनाने मंत्र्यांची नातंही रडली; लाडक्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला