TRENDING:

'आता भाऊबीज कोणाशी करणार', प्रथमेश कदमच्या निधनाच्या 2 दिवसांनी बहिणीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

Last Updated:
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं अकाली निधन झालं.त्याच्या निधनाच्या दोन दिवसांनी त्याच्या बहिणीची हृदयस्पर्शी पोस्ट समोर आली आहे.
advertisement
1/8
'आता भाऊबीज कोणाशी करणार', प्रथमेशच्या निधनाच्या 2 दिवसांनी बहिणीची भावुक पोस्ट
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं 26 जानेवारी रोजी पहाटे निधन झालं. आईबरोबर मजेशीर रील्स बनवणारा प्रथमेश हे जग सोडून गेला. प्रथमेशच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. 
advertisement
2/8
प्रथमेशचा मित्र आणि कंटेट क्रिएटर तसंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्मय पटेकर याने त्याच्या आजाराची माहिती दिली. प्रथमेशला टायफॉइड आणि रक्तात कावीळ झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र त्याचं निधन झालं. 
advertisement
3/8
प्रथमेश हा त्याच्या कुटुंबाचा आधार होता. कोरोना काळात त्याच्या वडिलांचा निधन झालं होतं.  त्यानंतर त्याने आई आणि बहिणीला खंबीर आधार दिला. आईला देखील रीलस्टार बनवलं. सोशल मीडियावर प्रथमेश आणि त्याच्या आईची जोडी खूप हिट होती.  
advertisement
4/8
प्रथमेशच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची बहिण प्रतिक्षा कदम हिने भावाच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत मन हादरवणारी पोस्ट लिहिली आहे.
advertisement
5/8
प्रतिक्षाने प्रथमेशबरोबरचे फोटो शेअर केलेत. एका पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “दादा येणारे परत… मी खूप एकटी पडली आहे. तुझी खूप आठवण येते. मी हे सहन करू शकत नाही की तू निघून गेलायस. माझ्यासाठी आणि आपल्या मम्मीसाठी तरी ये ना."
advertisement
6/8
[caption id="attachment_1604118" align="aligncenter" width="750"] "तुझं हे जायचं वय नाही… आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची होती. मग असं का केलंस? मला एकटीला टाकून का गेलास? आता मी भाऊबीज कोणाशी करणार, रक्षाबंधन राखी कोणाला बांधणार?"</dd> <dd>[/caption]
advertisement
7/8
आणखी एक पोस्ट शेअर करत त्यात प्रतिक्षाने लिहिलंय, "दादा काय केलंस रे तू… आम्हाला सोडून गेलास. आम्ही कोणाकडे बघणार, कसं जगणार? आता आम्ही दोघीच फोटो काढणार का?"
advertisement
8/8
प्रथमेश कदमच्या निधनानंतर अनेक नेटकरी त्याच्या आई आणि बहिणीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. हसऱ्या रील्समागची ही दु:खद वास्तवकथा सध्या सर्वांच्याच मनाला चटका लावत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आता भाऊबीज कोणाशी करणार', प्रथमेश कदमच्या निधनाच्या 2 दिवसांनी बहिणीची मन हेलावून टाकणारी पोस्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल