पुण्यामध्ये गुंडांनी थेट पोलिसावरच कोयत्याने हल्ला केला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. आपली ड्युटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली. गाडी ओव्हरटेक केली म्हणून गुंडांनी कोयत्याने हल्ला केला.