पुण्यातील बापदेव मित्र मंडळाने यंदा राम मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. यामध्ये ११ फुटांची लालबागच्या राजाची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. पुणेकरांना लालबागच्या दर्शनासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही, असं म्हणत मंडळाने भाविकांना खास आमंत्रण दिलं आहे.