
पुणे, : आपल्या घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. बऱ्याचदा सर्व सोयीसुविधा असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. या अडचणीत कसा मार्ग काढावा यावर पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी टिप्स दिल्या आहेत. कशा टाळणार घरातील कटकटी? ‘वास्तू शास्त्रानुसार, ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण होते. घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे. ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करते. ते भगवान शिवाचं स्थान आहे. घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा. घरामध्ये जर सतत वाद विवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टॅन्ड , कचऱ्याचा डब्बा ठेवू नये, ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधी वस्तू ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीचा ऱ्हास होतो,’ असे जोशी यांनी सांगितले
Last Updated: December 03, 2025, 15:36 ISTपुणे : आर्थिक ताण, कौटुंबिक कलह, सततची स्पर्धा आणि मानसिक दडपणाचा वाढता बोजा… या सर्वांचा परिणाम पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर स्वरूपात होत असल्याचे चिंताजनक चित्र पुण्यात समोर आले आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल 558 पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार समोर आली आहे. एकूण 710 स्त्री-पुरुषांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली असून त्यापैकी 78 टक्के केसेस पुरुषांच्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागवलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.
Last Updated: December 03, 2025, 14:51 ISTपुणे : शाही व्हेज कुर्मा खायला अनेकजण हॉटेलमध्ये जातात. पण हॉटेलसारखीच चव आता घरीही मिळू शकते. कमी वेळात बनणारी ही शाही व्हेज कुर्माची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. याची रेसिपी आपल्याला गृहिणी वसुंधरा यांनी सांगितली आहे.
Last Updated: December 03, 2025, 14:39 ISTमुंबई : मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत कोकणाची माती, सुगंध आणि परंपरा जपणारे एक ठिकाण आजही दादरमध्ये अविरत उभे आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ गजानन साळवी काका आपल्या छोट्याशा स्टॉलमधून मुंबईकरांना कोकणाची अस्सल चव चाखवत आहेत. बदलत्या काळात कितीही आधुनिक खाद्यसंस्कृती आली तरी साळवी काकांच्या स्टॉलसमोर उभे राहिल्यावर घरगुती कोकणी चवीचा मोह टाळणे अशक्यच ठरते.
Last Updated: December 03, 2025, 14:04 ISTसोलापूर : पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे शहराकडे धाव न घेता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील शेतकरी तानाजी हळदे यांनी एका एकरात गुलाबाची शेती केली आहे. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. गुलाबाची लागवड करून चार वर्षे झाले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांचे उत्पन्न तानाजी हळदे यांनी घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी तानाजी हळदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: December 03, 2025, 13:45 IST