राजा मयाळ, प्रतिनिधी : गणेश चतुर्थी निमित्त वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी अक्षर गणेशा मधून अष्टविनायक गणपतीचे चित्र रेखाटले आहेत. हे एक एक चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अवघ्या पाच मिनिटांचा अवधी लागला. अशा अनेक अक्षरांमधून त्यांनी गणपती साकारलेले आहेत 500च्या वरती त्यांनी अक्षर गणेश तयार केलेले आहेत.