शिर्डीत चार दिवस चालणाऱ्या साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली आहे. साईबाबांच्या काकडआरतीनंतर फोटो आणि पोथीची मिरवणूक काढत या उत्सवाला सुरुवात झाली. विजयादशमीचा दिवस हा या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्यानिमित्तानं शिर्डीत लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.