
सातारा: क्षयरोग अर्थात टीबी हे नुसते नाव ऐकले तरी आजही मनात धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोग उपचार करण्यायोग्य आहे. तरी देखील योग्य काळजी न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Last Updated: November 18, 2025, 13:25 ISTछत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंबेफळ येथील अनिल शेळके हे दुधापासून तयार होणाऱ्या तूप, दही, श्रीखंड, लस्सी यासह विविध पदार्थांचे स्वतः उत्पादन घेतात. त्यांच्याकडे दूध संकलन केंद्र देखील आहे. शेळके यांनी सन 2020 मध्ये विघ्नहर्ता गोविन या नावाच्या उत्पादनाची निर्मिती केली. तसेच त्यांचे पदार्थ महाराष्ट्रासह परदेशात देखील विक्री केले जातात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत असून खर्च वजा करून एकूण निव्वळ कमाई 10 ते 12 लाख रुपये वर्षाकाठी मिळत असल्याचे शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: November 18, 2025, 16:28 ISTमुंबई: आजपर्यंत आपण वेगवेगळ्या स्टाईलच्या पिशव्या, विविध साईजच्या बॅग्स आणि डिझाईनदार हँडबॅग्स किंवा गळ्यात अडकवायच्या स्लिंग बॅग्स पाहिल्या असतील. पण मोबाईलसाठी खास बनवलेली बॅग. तीही बॅग नसून बेल्टच्या रूपात आणि पूर्णपणे सुरक्षित असेल, असं तुम्ही कधी पाहिलं आहे का? हीच अनोखी कल्पना मुंबईकर आकांक्षा दळवीने प्रत्यक्षात आणली आहे
Last Updated: November 18, 2025, 16:44 ISTसांगली: अलिकडे कित्येक तरुण हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरताना दिसतात. परंतु बक्कळ पैसे दिसणाऱ्या हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी प्रचंड धाडस आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते. असेच दांडगे धाडस दाखवत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या ग्रामीण भागातील सुरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारला आहे. पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकूया. जिद्दी हॉटेल व्यावसायिक सुरज वंजारी यांच्याकडून लोकल18ने जाणून घेतला.
Last Updated: November 18, 2025, 15:46 ISTयंदा मान्सून जोरदार बरसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, रब्बी हंगामात मान्सून च्या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने रबी पेरणी करू लागले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बी हंगामात गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. पाहुयात गव्हाच्या कोणत्या उन्नत जाती आहेत ज्या चांगले उत्पादन देऊ शकतात.
Last Updated: November 18, 2025, 15:07 ISTमुंबई: सध्या नोकरीपेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य दिलं जातं. अशाच पद्धतीने अंधेरीतील इरफान खान आणि सौरभ गुंजाळ या दोन मित्रांनीही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोघांची मैत्री बारा वर्षांची असून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक रेस्टॉरंटमध्ये एकत्र काम केलं. काम करताना दोघांची स्टाईल, समज आणि टीमवर्क चांगलं जुळलं आणि म्हणून एकत्र व्यवसाय करायचा प्लॅन तयार झाला.
Last Updated: November 18, 2025, 14:26 IST