
सांगोला नगरपालिकेत जिंकल्यानंतर विजयी सभेत नेते शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेले माजी आमदार दीपक साळूंखे आणि शेकापाचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपवर मिश्किल टीका केली आहे. ते म्हणाले, " दीपक आबा पांढऱ्या पायाचा, जिथं जातील तिथं पराभव होतो" अशी बोचरी टीका केली आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 15:04 ISTअहिल्यानगरमध्ये शिर्डी साईमंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवे वर्ष सुरु होणार आहे. तसेच पर्यटन सुरु झाले आहे. त्यामुळे या मंदिरात खूपच भक्तांची गर्दी झाली.चक्क देशविदेशातून भक्त साईचरणी लीन झाले आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 17:45 ISTचंद्रपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रपूरमध्ये सध्या बांबू कापायचे काम सुरु आहे. त्यासाठी तेथे बालाघाटातून मजूर आले आहेत. त्यातील काही मजूर ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील महादवाडीच्या जंगलात काम करत होते. तेव्हा वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यु झाला आहे. प्रेम सिंग हुदे आणि बुधासिंग मढावी अशा मृत व्यक्तींची नावे आहेत.
Last Updated: Dec 28, 2025, 17:32 ISTबिबट्याची दहशत राज्यभर सुरु आहे. त्यातच आता सांगली, येडे निपाणी तालुक्यात वाळवा येथे नारळाच्या झाडावर बिबट्या चढलेला दिसून आला. उत्तम पाटील यांच्या शेतात बिबट्या नारळाच्या झाडावरुन खाली उतरताना काही नागरिकांना दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.गेल्या महिन्याभरात अनेकवेळा बिबट्याचा परिसरात वावर दिसून आला आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 17:17 ISTराज्यात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, आता मुंबई महानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचाच लक्ष आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युतीही पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांच्या जागावाटपाचा तेढ नेमका काय आहे? यावर मोठी चर्चा होत आहे. तेव्हाच शिवसेना उबाठाचे खासदार ,संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की,"जागांवरुन कोणतीही रस्सीखेच नाही. मुंबई पालिका निवडणुक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची,अस्मितेची लढाई आहे."
Last Updated: Dec 28, 2025, 16:27 ISTमुंबईत शिवसेना भवनात उबाठाची बैठक झाली. तेव्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना विभाग प्रमुख,शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन केले आहे. तेव्हा ते म्हणाले,"भाजपने युतीच नाही तोडली तर,ते आता शिवसेना खतम करायला निघालेत. मुंबईत एकदा काय शिवसेना खतम झाली की ते मुंबई गीळायला मोकळे झाले.
Last Updated: Dec 28, 2025, 15:50 IST