सोलापूर - सीना नदी काठी असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावाला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. कोळेगाव वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सेना नदी दुथळी भरून वाहत होती. तिऱ्हे गावात राहणाऱ्या नंदाबाई पुरी त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेल. भाजीपाला विक्री करून नंदाबाई यांनी एक एक वस्तू गोळा केली होती. पण या महापुरामध्ये जमा केलेल्या वस्तू वाहून गेले आहे.