सोलापूर : दह्यापासून ताक, लोणी तयार करण्यात स्वयंपाकघरातील मदतनीस असलेल्या लाकडी रवीमध्ये काळानुरूप बदल होत आहेत. कधी पितळ, कधी ॲल्युमिनियम तर कधी स्टेनलेस स्टील अशा विविध धातूंचे आणि त्यासोबत स्प्रिंग अन् प्लास्टिकच्या रवी बाजारात विक्रीस आल्या अन् त्या घराघरात पोहोचल्या. मात्र, आजही मोठ्या प्रमाणात लाकडी रवीने आपले स्वयंपाकघरातील स्थान टिकवून ठेवले आहे.