इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी सध्या राजकोटमध्ये सुरु आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यापैकी एक आहे मुंबईचा सरफराज खान. अनिल कुंबळेच्या हातून सरफराजला टेस्ट कॅप प्रदान करण्यात आली. यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांना रडूच कोसळलं.