तळोजा MIDC येथील शिवजागृती हॉटेल समोर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवले. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दुसरा जखमी गंभीर अवस्थेत कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित वाहनचालकाविरोधात पोलीस कारवाई करीत आहेत.